प्रधानमंत्री उज्वला योजना

 प्रधानमंत्री उज्वला योजना....



देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने विचाराने त्यांनी प्रधानमंत्री उज्वला योजना अल्पभूधारक उत्पन्न असणाऱ्या गटातील महिलांना चुलीवर जेवण करायला लागू नये यासाठी LPG गॅस कनेक्शन मोफत देण्याची योजना आणली होती या प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे देशातील लाखो अल्प उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथे सुरू केली. या योजनेअंतर्गत, अल्प उत्पन्न असणाऱ्या  कुटुंबांना पुढील 3 वर्षांत प्रति कनेक्शन 1600 रुपयांच्या आधारे 5 कोटी एलपीजी कनेक्शन दिले जातील.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट महिला आणि बालकांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन - एलपीजी पुरवून त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आहे, जेणेकरून त्यांना धुराने भरलेल्या स्वयंपाकघरात किंवा लाकूड गोळा करण्यासाठी असुरक्षित राना- वनात जंगलात ठिकाणी भटकावे लागणार नाही


विशेषत: ग्रामीण भारतातील महिला सक्षमीकरण सुनिश्चित करून घरातील महिलांच्या नावाने कनेक्शन जारी केले जातील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक आर्थिक जात जनगणना डेटाद्वारे बीपीएल कुटुंबांची ओळख पटवली जाईल.



प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे. 

स्वच्छ इंधन,

अधिक चांगले जीवन,

महिलांना मिळणार सन्मान, 

उज्वलाने बनवलं  सोपं जीवन.

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत विना मोबदला दिलेले स्वयंपाकाचे गॅस जोडणी 9 करोड पेक्षा जास्त आहेत.


प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थी

 योजनेतील 35% पस्तीस टक्के  एससी/ एसटी लाभार्थी आहेत.

देशात स्वयंपाक गॅस कव्हरेज, 
 कोरोना काळात विना मोबदला दिलेले गॅस जोड 9 करोड पेक्षा जास्त योजनेच्या माध्यमातून जवळपास एक लाख लोकांना मिळाला रोजगार मिळाला.


प्रत्येक कनेक्शन साठी 1600 रुपये अनुदान दिले जाईल. 

अधिक माहितीसाठी :-  https://pmujjwalayojana.in




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

अटल पेंशन योजना