प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना.
भारत सरकारचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन 2016 मध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेची सुरुवात केली, खऱ्या अर्थाने याची सुरुवात करण्याचा हेतू हा भारतातील सर्वसाधारण गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या गर्भवती स्त्रियांना याचा फायदा व्हावा हा हेतू होता.
आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गर्भवती स्त्रियांना दवाखान्यामध्ये जाऊन प्रस्तुती करण्यात यावी आणि त्यांचं आयुष्यमान हे आनंदी सुखी आणि समृद्ध व्हावे हा हेतू होता.
प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो गरोदर महिला आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करत आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेचा उद्देश:
1) गर्भवती स्त्रियांचा मृत्यू दर कमी करणे
2) सर्व गर्भवती महिलांना दर्जेदार प्रसूतीपूर्व काळजी प्रदान करणे
3) उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणा असलेल्या स्त्रियांना ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे
4) सुरक्षित मातृत्वाबद्दल जागरूकता वाढवणे
5) गर्भवती महिलांसाठी एक निरोगी जीवन प्रदान केले जाईल.
6) मातृत्व मृत्यू दर कमी केला जाईल
7) गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि परिस्थितीबाबत जागरूक केले जाईल.
8) मुलांचे निरोगी जीवन आणि सुरक्षित प्रसूती ची खात्री केली जाईल.
9) पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाचे प्रमुख वैशिष्टे
10) महिलांना त्यांच्या आरोग्य समस्यांच्या आधारावर वेगळे चिन्हांकित केले जाईल ज्यामुळे डॉक्टरांना सहजपणे समस्या ओळखू शकतील.
11) भारत सरकारने या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना सर्व प्रकारचे वैद्यकीय सहाय्य मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व या योजने अंतर्गत ज्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याची यादी खालील प्रमाणे.
1) रक्तदाब
2) साखर प्रमाण
3) हिमोग्लोबिन तपासणी
4) रक्त तपासणी
5) सोनोग्राफी
6) मोफत ऍम्ब्युलन्स सुविधा.
प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेचे फायदे:
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये सर्व गरोदर महिलांना प्रस्तुती पूर्व काळजी साठी मोफत तपासणी केली जाते.
अत्यावश्यक औषधे आणि आहारातील पूरक आहाराची तरतूद उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणा असलेल्या महिलांसाठी अतिरिक्त चाचणी आणि उपचार सुरक्षित मातृत्वाविषयी माहिती आणि शिक्षण
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये सर्व गरोदर महिलांना प्रस्तुती पूर्व काळजी साठी मोफत तपासणी केली जाते.
देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेची सुरू करण्याचे उद्दिष्ट आणि उद्दिष्टे अधोरेखित केली होती दिनांक 31 जुलै 2016 च्या मन की बात या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सविस्तर याविषयी माहिती भारतातील सर्व नागरिकांना दिली होती
9 जानेवारी प्रत्येक वर्षी मातृत्व दिवस साजरा केला जातो ही योजना मातृत्व काळामध्ये महिलांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली योजना होती.
प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक प्रस्तुती पूर्व तपासण्या करण्यात आले आहे
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेनुसार सर्व सरकारी रुग्णालय आरोग्य केंद्र यामध्ये नऊ तारखेला सर्व गर्भवती महिलांचे वैद्यकीय उपस्थित केली जाते यामध्ये शुगर लेवल रक्तदाब वजन आणि इतर सर्व तपासण्या केल्या जातात .
जेव्हा एखादी गर्भवती स्त्री तीन ते सहा महिन्याची होईल तेव्हा त्या महिलेला सरकारी दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर तपासणी केली जाते किंवा खाजगी डॉक्टरांना सुद्धा या योजनेत सहभागी करून घेतली जाते.
या योजनेअंतर्गत वेळेवर तपासणी केल्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे अतिशय सोपे जाते ,
ही योजना संपूर्ण भारतामध्ये भारत सरकार द्वारा दिलेली पूर्णपणे मोफत आरोग्य सुविधा आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेसाठी पात्रता:
भारतातील सर्वसाधारण गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यासर्व गरोदर महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
योजनेसाठी अर्ज कसा करावा:
* गरोदर महिला त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
या सर्व सुविधा हा जवळच्या सरकारी दवाखान्यात केल्या जातात व त्यासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी https://pmsma.nhp.gov.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा