सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधीची

 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या १८,८८२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.



 ही भरती राज्य सरकारने काढली आहे आणि इच्छुक उमेदवारांना संबंधित अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.






या पदांसाठी काही महत्त्वाची माहिती:



  • पदांचा प्रकार: अंगणवाडी सेविका, मदतनीस
  • एकूण पदे: १८,८८२
  • पात्रता: शिक्षण, वयोमर्यादा आणि इतर अटी साठी संबंधित अधिकृत सूचना पहा
  • अर्ज कसा करावा: संबंधित सरकारी वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक
  • महत्त्वाची तारीख: अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर महत्त्वाची तारीख सरकारी सूचनांमध्ये दिली आहे.

राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये आता मतदणीस आणि अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे. वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिरातीही काढण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात? असे विचारले जात आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 


अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार? 








अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्र (सांक्षाकित सत्य प्रती)


1. तहसिल कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)

2. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र

3. सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)

4. सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)

5. शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ
 अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)

6. शैक्षणीक अर्हता / पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक राहील.

7. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना किमान आर्हता
 12 वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे

8. डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गूणपत्रक व प्रमाणपत्रक.

9. विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)

10. उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.

11. अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास) 

12. आधार कार्ड


सर्व इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करण्याची सूचना दिली जात आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपशील पाहू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मागेल त्याला शेततळे

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री उज्वला योजना