प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना. भारत सरकारचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन 2016 मध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेची सुरुवात केली, खऱ्या अर्थाने याची सुरुवात करण्याचा हेतू हा भारतातील सर्वसाधारण गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या गर्भवती स्त्रियांना याचा फायदा व्हावा हा हेतू होता. आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गर्भवती स्त्रियांना दवाखान्यामध्ये जाऊन प्रस्तुती करण्यात यावी आणि त्यांचं आयुष्यमान हे आनंदी सुखी आणि समृद्ध व्हावे हा हेतू होता. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो गरोदर महिला आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेचा उद्देश: 1) गर्भवती स्त्रियांचा मृत्यू दर कमी करणे 2) सर्व गर्भवती महिलांना दर्जेदार प्रसूतीपूर्व काळजी प्रदान करणे 3) उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणा असलेल्या स्त्रियांना ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे 4) सुरक्षित मातृत्वाबद्दल जागरूकता वाढवणे 5) गर्भवती महिलांसाठी एक निरोगी जीव...